Saturday, February 24, 2024
Homeचंद्रपूरअँड यादवराव धोटे महाविद्यालय येथे" मेरी माटी मेरा देश " अंतर्गत तीन...
spot_img

अँड यादवराव धोटे महाविद्यालय येथे” मेरी माटी मेरा देश ” अंतर्गत तीन दिवसीय उपक्रम संपन्न.

तालुका प्रतिनिधी राजुरा 18 ऑगस्ट:-

अँड यादवराव धोटे मेमोरियल सोसायटी, राजुरा द्वारा संचालित अँड यादवराव धोटे महाविद्यालय येथे ” मेरी माटी मेरा देश ” अंतर्गत तीन दिवसीय उपक्रम राबवण्यात आला . यादरम्यान विद्यार्थ्यांकरीता विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. यामध्ये देशभक्तीपर घोषवाक्य स्पर्धेत प्रथम क्रमांक कु . सुखदा जितेंद्र देशकर , व्दितीय क्रमांक अविश विशाल दुधे यांनी प्राप्त केला तसेच निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक कु.काजल विठ्ठल डोंगरे, द्वितीय क्रमांक कु. पूर्वा विलास निवलकर यांनी पटकावला तसेच चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. मोनिका नागोराव भेंडेकर, व्दितीय क्रमांक कु.पायल अशोक अधिकारी यांनी पटकाविला या कार्यक्रमाचा समारोप 15 ऑगस्ट रोजी घेण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुधीर धोटे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांनी समस्त वीरांना नमन करून, तंबाखू, गुटखा तसेच इतर व्यसनापासून कसे मुक्त राहता येईल व आपले शरीर कसे सुदृढ ठेवता येईल यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले याप्रसंगी प्रमुख पाहूणे संस्थेचे उपाध्यक्ष अँड संजय धोटे, संस्थेचे सचिव डॉ.अर्पित धोटे,वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या मीनाक्षी कालेश्वरवार, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या वर्षा पोडे तसेच अमेय धोटे, अभिलाष धोटे, बाबू जैन तसेच आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. इर्शाद शेख यांनी केले, तसेच स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्तावर जिल्हास्तरावर मैदानी स्पर्धा तसेच मुलींच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केलेल्या स्पर्धेचे प्रमाणपत्र व बक्षीस वितरण करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अल्पना कवाडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता संपूर्ण प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांनी अथक परिश्रम घेतले.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page