Sunday, February 25, 2024
Homeचामोर्शीदेवतळे महाविद्यालयात पंचायत समिती व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान...
spot_img

देवतळे महाविद्यालयात पंचायत समिती व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर

चामोर्शी:- येथील कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त “मेरी माटी मेरा देश” या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभाग, पंचायत समिती व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या सभागृहात रक्तदान शिबीर घेण्यात आले.
या शिबिरामध्ये एकूण २९ रक्तदात्यांनी रक्तदान केले,यामध्ये विशेषत्वाने मा.श्री.सागर पाटील संवर्ग विकास अधिकारी,मा.डॉ. प्रफुल हुलके तालुका आरोग्य अधिकारी, रा.से.यो. सहकार्यक्रम अधिकारी प्रा.संकेत एस.राऊत तसेच महाविद्यालयातील रा.से.यो.सहभागी विद्यार्थी व कर्मचारी वर्ग यांनी रक्तदान केले.
या कार्यक्रमाला तहसीलदार मा. प्रशांत घोरुडे, प्राचार्य डॉ.डी.जी.म्हाशाखेत्री,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.आर.डी.बावणे,प्रा.डॉ.आर.एम.झाडे, प्रा.डॉ.भूषण आंबेकर, प्रा. दीपक बाबनवाडे, , प्रा.अरुण कोडापे,प्रा.रोशन गेडाम, प्रा.डॉ.प्रसेन ताकसांडे, प्रा.मीनल गाजलवार, प्रा.वैशाली कावळे,प्रा.स्नेहा उसेंडी,प्रा.जयश्री बोबाटे तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील रक्त संक्रमण अधिकारी मा.डॉ.अशोक तुमरेटी, व त्यांची चमू श्री.तुषार मंगर,श्री.गोविंदा कडस्कर,श्री.मोहन भुरसे,श्री.माणूसमारे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन प्रा.वैशाली कावळे यांनी केले तर आभार प्रा.डॉ.आर.एम.झाडे यांनी मानले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी सहकार्य केले.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page