Friday, February 23, 2024
Homeचामोर्शीशेडमाके विद्यालयात रुचिता बंडावर यांच्या हस्ते ध्वजारोहन
spot_img

शेडमाके विद्यालयात रुचिता बंडावर यांच्या हस्ते ध्वजारोहन


चामोर्शी : – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तीन दिवसीय ध्वजारोहणाच्या पहिल्या दिवशीचा मान ज्येष्ठ शिक्षिका रुचिता बंडावार यांना देण्यात आला .
याप्रसंगी प्राचार्य अनिल गांगरेड्डीवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना पुरुषांबरोबर अधिकार प्रदान व्हावे या उद्दात हेतूने सदर ध्वजारोहण करण्याची अनुमती दिली . त्यानंतर मेरी माटी ,मेरा देश , – विरों को नमन या उपक्रमा अंतर्गत पंचप्राण शपथ , निबंध , चित्रकला
व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . यात क्रमांकधारक विजेत्या विद्यार्थ्यांना 15 ऑगस्ट रोजी बक्षीस व प्रमाणपत्र वितरण करण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्यांनी दिली . यावेळी ज्येष्ठ शिक्षक नरेंद्र चिटमलवार , सुरेश केळझरकर , सुवेंदू मंडल , गजानन बारसागडे ,अनिल निमजे , चंदू सातपुते , कु . निशा रामगुंडे ,अभिषेक ढोंगे , विशाल मंडल , रोशन वासेकर , गणेश कोपुलवार , स्वप्नील गुज्जलवार , प्राध्या . किशोर पोहनकर , प्राध्या . श्रृती मोतकुरवार , तिरुपती बैरवार , सुरज मुनगेलवार , शितल गेडाम , रसिका सातार , वैशाली वासेकर आणि विद्यार्थी उपस्थित होते . सदर प्रसंगी सूत्रसंचालन गजानन बारसागडे तर मानवंदना विशाल मंडल यांनी तर ध्वजारोहन रुचिता बंडावार यांनी केले . कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले .

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page