Sunday, February 25, 2024
Homeचामोर्शी'मेरी माटी मेरा देश ' कार्यक्रम साजरा
spot_img

‘मेरी माटी मेरा देश ‘ कार्यक्रम साजरा

चामोर्शी:- तालुक्यातील कुरूड येथील ग्रामपंचायत येथे ‘मेरी माटी मेरा देश’ हा कार्यक्रम 9 ऑगस्ट बुधवार क्रांतीदिना निमित्य साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमानिमित्य शिलाफलकाची उभारणी , वसुधा चंदन म्हणून 75 वृक्षांच्या रोपांची लागवड, स्वातंत्र्यसैनिकांना वंदन व पंचप्राण शपथ असे कार्यक्रम राबविण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ ते १४ ऑगस्ट 2023 दरम्यान ‘मेरी माटी मेरा देश’ हा अभियान घोषित केला, या अभियाना माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या, सर्वस्व गमावलेल्या, बलिदान दिलेल्या
देशवीरांप्रती नतमस्तक होण्याची व त्यापासून प्रेरणा घेऊन देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमात माननिय सरपंच विनोद मडावी, मा. उपसरपंच बाबुराव शेंडे, मा. ग्रामसेवक डी. एल.आष्टेकर, व इतर ग्रामपंचायत सदस्य व गावातील शेतकरी बांधव आणि केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी वैष्णवी बुध्देवार, वैभवी पोफळी, तृप्ती घटे , गौरी चौधरी, श्रुतीका लोहकरे,
आचल येंबडवार,प्राची मोंगरकर, राधा तुमरेटी, युगांती झाडे, नागेश्वरी बोडे उपस्थित होते.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page