Sunday, February 25, 2024
Homeचामोर्शीबोमनवार विद्यालया पोषक तृणधान्य विषयी जागृती
spot_img

बोमनवार विद्यालया पोषक तृणधान्य विषयी जागृती


चामॉर्शी- जा.कृ बोमनवार माध्यमिक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात प्रधानमंत्री पोषक शक्ती निर्माण योजना कृती कार्यक्रमांतर्गत पोषक तृणधान्य विषयी जागृती कार्यक्रम १२ अगस्ट २०२३ ला घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य इतेंद्र चांदेकर, प्रमुख वक्ते- कृषी पर्यवेक्षक- दिनेश चापले, मार्गदर्शक-कृषी सहाय्यक – श्रीनिवास रणमले, कृषी सहाय्यक प्रसिद्ध वालदे आधी उपस्थित होते प्रमुख वक्ते यांनी तृणधान्य व कडधान्य आरोग्यासाठी कसे उपयुक्त ठरतात तसेच गहू,ज्वारी, बाजरी,तांदूळ, नाचणी, कांदो,कुटकी यापासून शरीराला ऊर्जा मिळते व शरीरातील रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत मिळते याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
कृषी सहाय्यक-श्रीनिवास रणमले यांनी शरीराला पोषक तत्त्व न मिळाल्यास विविध प्रकारचे आजार बडावतात कार्बोदके, जीवनसत्व, प्रथीनयुक्त पदार्थाचे दररोज सेवन करावे तेव्हाच शरीर बलशाली राहील याविषयी मार्गदर्शन केले
“पौष्टिक तृणधान्य खाऊया व निरोगी राहूया ” अध्यक्ष यांनी पोषक तृणधान्या विषयीचे महत्त्व सांगितले
संचालन-पोषण आहार प्रमुख स.शि.मनोज बोमनवार तर आभार प्रदर्शन- स.शि. संजय हिचामी यांनी केले. याप्रसंगी प्राध्यापक शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वृद, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page