Sunday, February 25, 2024
Homeगडचिरोलीस्वांतत्र्याच्या 50 वर्षानंतरही दराची गावाच्या नशिबी दगडाचा रस्ता
spot_img

स्वांतत्र्याच्या 50 वर्षानंतरही दराची गावाच्या नशिबी दगडाचा रस्ता


सांगा साहेब जायचे कसे नागरिकांचा सवाल
दिवाकर भोयर धानोरा तालुका प्रतिनिधी:- गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील निसर्गरम्य वातावरणात व डोंगरदर्‍याच्या पायथ्याशी वसलेला दराची हे गाव. मुंजालगोंदी गटग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या गावाची लोकसंख्या जवळपास 270 च्या घरात आहे. हा गाव धानोरा तालुक्याच्या मुख्यालयापासून जवळपास 15 किलोमीटरच्या अंतरावर आहे .दराची या गावाला जाण्यासाठी वडगाव मार्गे व माळंदा मार्गे असे दोन रस्ते आहे. त्यापैकी माळंदा या गावावरून जाण्यासाठी कठाणी नदी पडते या कठाणी नदीला पुलच नसल्याने पावसाळ्यात नदीला पाणी राहातं असल्याने तो मार्ग पावसाळ्यात बंद असतें. त्यांचे अंतर 5किलोमीटर पडते. तर त्यांना वडगाव मार्गे धानोरा मुख्यालयाला यावे लागते हा रस्ता जवळपास 15 किलोमीटरचा आहे. व हे अंतर कापण्यासाठी गावकऱ्यांना 45 मिनिटांचा अवधी लागतो. जवळच्या मार्गाने 15ते 20 मिनिटांमध्ये पोहोचायला पाहिजे. कारण त्या गावाला जाण्यासाठी किर्रर्र घनदाट जंगलातून जावे लागते .तसेच त्या रस्त्याने पूर्णपणे दगड निघलेले आहेत.तेही मोठे मोठे दगड असल्याने या रस्त्यावरून दुचाकी गाडीने जाणे मोठे जिकरीचे आहे.रस्त्यावरुण जात असताना तोल जाऊन चालक कधी पडेल ते सांगता येत नाही. गाडी पंचर होन्याची शक्यता नाकारता येत नाही.अशा या महामार्गाला सुद्धा होते अशा परिस्थितीत जंगलाचा रस्ता असल्यामुळे दुसरे कोणतेही साधन मिळणार नाही. त्यामुळे गाडी सरळ वडगाव पर्यंत गाडी ढकलत आणावे लागते . अशी शोकांतिका आहे.देश प्रगती करीत आहे.पण तालुक्यातील गावाची अवस्था वाईट आहे.ही स्थिती दराची या गावची आहे जर गरोदर माताना या रोड नी ऍम्ब्युलन्स नी आणले तर रस्त्यातच मातेचि प्रसूती होईल किंवा तिच्या जीवाचं बरंवाईट होईल. एखाद्या रुग्णाला रुग्णालयात आणाचे म्हटलं तरी जिकरीचे आहे. आमच्या गावाला पक्का रस्ता केव्हा होणार असा संतप्त सवाल गावातील नागरिक विचारत आहे

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page