Friday, February 23, 2024
Homeचामोर्शीशेवटच्या शेतकऱ्याच्या बांधावर पाणी पोहचेल अशी व्यवस्था करा--आ. डॉ. देवरावजी होळी
spot_img

शेवटच्या शेतकऱ्याच्या बांधावर पाणी पोहचेल अशी व्यवस्था करा–आ. डॉ. देवरावजी होळी

कन्नमवार जलाशय रेगडी येथे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते जलपूजन कार्यक्रम संपन्न

चामोर्शी:- रेगडी कन्नमवार जलाशयाच्या पाण्याचा सदुपयोग करून शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहोचून त्या शेतकऱ्याला त्या पाण्याचा लाभ मिळेल याकरिता पाटबंधारे विभागाने व्यवस्था करावी अशी सूचना आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी आज दिनांक ९ ऑगस्ट रोजी रेगडी कन्नमवार जलाशयाच्या जलपूजनाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी केली.

या जलपूजनाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी कार्यकारी अभियंता मोरघडे, उपविभागीय अधिकारी मेश्राम, शाखाधिकारी घोट विकास दुधबावरे, चामोर्शीचे शाखाधिकारी बोधलकर ,भाजपाचे तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, बंगाली आघाडी अध्यक्ष सुरेश शहा, मुरखळा माल चे सरपंच भास्कर बुरे ,काशिनाथ बुरांडे यांचे सह शेतकरी बांधव व संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी २४ तासात रेगडी कन्नमवार जलाशयाच्या मुख्य कालव्याच्या दुरुस्तीबाबत दिलेल्या निर्देशाचे पालन पाटबंधारे विभागाने केले त्याचेच फलित या जलपूजनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिसुन आले. लाभित सर्व शेतकऱ्यांना या जलाशयाच्या पाण्याचा लाभ मिळावा . शेवटच्या टोकावरील (टेलवरील) शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचावे याची दक्षता व काळजी घेण्याची आवश्यकता असून ती संबंधित विभागाने व्यवस्थितपणे पार पाडावी अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page