Sunday, February 25, 2024
Homeचामोर्शीयशोधरा विद्यालयात शालेय मत्रिमंडळाचे गठन
spot_img

यशोधरा विद्यालयात शालेय मत्रिमंडळाचे गठन

चामोर्शी- स्थानिक यशोधरा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चामोर्शी येथे शालेय मंत्रिमंडळ निवडणूक घेण्यात आली.
या निवडणुकी प्रसंगी प्राचार्य शाम रामटेके आणि राहुल लोकविकास मंडळाचे कोषाध्यक्ष वक्तूजी उंदीरवाडे उपस्थित होते.
निवडणूक विभाग प्रमुख राजू धोडरे यांच्या मार्गदर्शनामधे
लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्यात आली, यामध्ये शाळेचे #मुख्यमंत्री पदी शारंग जेट्टीवार# , उपमुख्यमंत्री पदी-नवनीत साखरे#, क्रीडामंत्री- गौरव वसाके, उपक्रीडामंत्री – तृप्ती मेश्राम, सांस्कृतिक मंत्री- भाग्यश्री सोरते, उपसांस्कृतिक मंत्री -खुशी धोडरे, आरोग्य व स्वच्छता मंत्री- गौरव कोसरे, उपआरोग्य व उपस्वच्छता मंत्री – यश गव्हारे, उपसहल व पर्यटन मंत्री- धीरज मंडरे , उपपर्यटन मंत्री- गोपीचंद बोरकर, शिक्षण मंत्री स्वेजल बुरांडे, शालेय पोषण आहार मंत्री. – अनिकेत चलाख, निवडून आले.
निवडणूक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रवीण नैताम, सरिता वैद्य, साजेदा कुरेशी, जयश्री कोठारे, अमोल उंदीरवाडे, सुधाकर भोयर, रुपलाता शेंडे यांनी सहकार्य केले.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page