Sunday, February 25, 2024
Homeचामोर्शीजनरल बुक डेपो पेपर असोसिएशन चामोर्शी तर्फे केंद्र शाळा चामोर्शी येथे चित्रकला...
spot_img

जनरल बुक डेपो पेपर असोसिएशन चामोर्शी तर्फे केंद्र शाळा चामोर्शी येथे चित्रकला स्पर्धा आयोजित


चामोर्शी:- राष्ट्रीय पेपर दिना निमित्य जनरल बुक डेपो पेपर मर्चंट व्यापारी असोसिएशन चामोर्शी मार्फत केंद्र शाळा चामोर्शी येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी केंद्र शाळा चामोर्शी येथील इयत्ता तिसरी ते सातवी पर्यँतचे एकूण 254 विद्यार्थी सदर चित्रकला स्पर्धेत भाग घेतले होते.पर्यावरण या विषयावर सर्व विद्यार्थ्यांनि सुंदर रेखाटन केले. जनरल बुक डेपो पेपर मर्चंट व्यापारी असोशियन मार्फत सर्व विद्यार्थ्यांना मोफत चित्रकला पेपर मोफत पुरविण्यात आले होते. सर्व विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्स्फूर्तपणे भाग घेतला होता. यावेळी जनरल बुक डेपो व्यापारी असोसिएशनचे अध्यक्षश्री. रमेश चकोर, उपाध्यक्ष तुलसीदास दुरबुळे, सचिव किशोर कापगते,राजेंद्र भांडेकर,सुरेंद्र भांडेकर, श्रीकांत गुरुनाथनवार,अजय बंडावर,किशोर गव्हारे, मिलिंद शेट्टे उपस्थित होते.
चित्रकला स्पर्धा समाप्त झाल्यानंतर जनरल बुक डेपो पेपर मर्चंट व्यापारी असोशियन चे अध्यक्ष रमेश चकोर,उपाध्यक्ष तुलसीदास दुर्बुळे,सचिव किशोर कापगते,प्रमुख पदाधिकारी राजेंद्र भांडेकर यांच्या हस्ते चित्रकला स्पर्धेत उत्तम चित्र रेखाटन करणाऱ्या प्रत्येक वर्गातील 10 विद्यार्थ्यांना पेन,वही व क्राफ्ट पेपर व प्रशस्तीपत्र भेट देण्यात आले.सोबत स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना पेन व पेन्सिल बक्षीस देण्यात आले.
सदर बक्षीस वितरण कार्यक्रमाचे संचालन शाळेतील शिक्षक मंगल मानमपल्लीवार यांनी केले. चित्रकला स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक वत्सला तांबडे,पर्यवेक्षक तुषार चांदेकर, शाळेतील शिक्षक निर्मला कोंडावार, नम्रता मार्तीवार, वंदना रामटेके, शालू कोडापे, दुधबावरे, जीवनदास सिडाम उपस्थित होते.सामाजिक बांधिलकी जोपासून जनरल बुक डेपो पेपर असोशियन मार्फत घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धे मुळे विद्यार्थ्याला संधी उपलब्ध झाली. सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन उत्साह द्विगुणीत करण्यात आला.याबद्दल शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक व पालकांच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिक्षक प्रविण पोटवार यांनी केले.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page