Sunday, February 25, 2024
Homeचामोर्शीआर्य वैश्य महासभा चामोर्शी तर्फे वृक्षारोपण
spot_img

आर्य वैश्य महासभा चामोर्शी तर्फे वृक्षारोपण


चामोर्शी:- महाराष्ट्र राज्याचे वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या 61 व्या वाढदिवसाचे निमित्त साधून,महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या चामोर्शी शाखेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले .
वृक्षारोपण नंतर त्यांचे संवर्धन होणे अत्यंत महत्त्वाचे असते, हे लक्षात घेऊन, संरक्षण भिंत असलेल्या शिवाजी विद्यालय चामोर्शीच्या भव्य प्रांगणात सदर वृक्षारोपण करण्यात आले.
या उपक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल अक्केवार, शिपाई नैताम यांनी स्वतः उपस्थित राहून सहकार्य केले तसेच उपमुख्याध्यापक, हरित सेनाचे शिक्षक दासेवार यांचेही सहकार्य लाभले.
यावेळी महाराष्ट्र आर्य वैश्य महिला महासभा गडचिरोली जिल्हा अध्यक्षा आरती भिमनवार,सचिव श्रद्धा बच्चूवार, सहसचिव नम्रता मार्तीवार,सदस्य आरती अलूरवार, अविता बंडावार,शीला आलुरवार, नगर पंचायत सदस्य एडवोकेट प्रेमा आईंचवार, समिक्षा मार्तीवार ,
आणि महाराष्ट्र आर्य वैश्य गडचिरोली जिल्हा कार्यकारणीचे सहसचिव प्रा.किशोर ओलालवार, सदस्य अनिल मार्तीवार, प्रशांत कोटगिरवार, अविनाश भिमनवार, आकाश पालारपवार , नगरपंचायत सदस्य अमोल गण्यारपवारआदी मान्यवरांनी वृक्ष लावले. महासभेचे जिल्हाध्यक्ष प्रा.प्रशांत तंमेवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.या वेळी पिंपळ, करंज, आवळा ,जांभूळ ,वड, इत्यादी प्रकारचे झाडे लावण्यात आली. सदर रोपटी चामोर्शी येथील वनविभागाच्या रोपवाटिकेमधून प्राप्त झाले. सदर कामासाठी वनक्षेत्रपाल अशोक लिंगमवार आणि वनरक्षक नैताम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page