Sunday, February 25, 2024
Homeचामोर्शीविद्यार्थ्यांची मने जिंकणारा शिक्षक हाच खरा नायक ठरतो - प्राचार्य अनिल गांगरेड्डीवार
spot_img

विद्यार्थ्यांची मने जिंकणारा शिक्षक हाच खरा नायक ठरतो – प्राचार्य अनिल गांगरेड्डीवार


चामोर्शी : – आपल्या शैक्षणिक जीवनात प्रत्येकच शिक्षक हा जबाबदारीने अध्यापनाचे कार्य करत असतो परंतु विद्यार्थ्यांच्या भाव -भावना, परिस्थिती आणि येणाऱ्या अडचणी याबद्दल विद्यार्थ्यांशी आपुलकीने सलोखा साधून केलेले ज्ञानदानाचे कार्य यामुळेच विद्यार्थ्यांची मने जिंकली जातात आणि ते शिक्षक सदैव आपल्या सेवाकाळात आपल्या कार्याचा जिवंतपणा टिकवून ठेवतात व त्याचेच उदाहरण हे वर्षोवर्षे चालत असते म्हणून आपल्या कार्यात कसर न करता विद्यार्थ्यांची मने जिंकणारा शिक्षक हाच त्या शाळेचा खरा नायक ठरतो असे प्रतिपादन शहीद बाबुराव शेडमाके माध्यमिक विद्यालय तथा कनिष्ठ कला महाविद्यालय आमगाव महाल येथे घेण्यात आलेला सेवापुर्ती सत्कार समारंभात शाळेचे प्राचार्य अनिल गांगरे ड्डीवार यांनी प्रतिपादन केले . ते सेवानिवृत्त झालेले शिक्षक प्रकाश निमकर यांचे विषयी गौरद्वोगार काढताना ते बोलत होते .
याप्रसंगी सत्कारमूर्तीचा सपत्नीक शाल , श्रीफळ , भेटवस्तू ,सन्मानचिन्ह , पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आला . म्हणून प्रकाश निमकर , पद्मा प्रकाश निमकर , मुलगी आदिती निमकर, माजी सरपंच तथा ग्रा. पं. सदस्य सुभाष कोठारे , भाऊराव देवतळे , ज्येष्ठ नागरिक मारोती बोदलकर , बाबुरावजी गट्टीवार ‘ श्रीवास पाल , चिलयाबाळ कामिडवार , तमुअ आकाश बोदलकर , वि लासजी कामिडवार विलास कारडे , राधेश्याम गोबाडे, कविता पुण्यपकर आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते . याप्रसंगी सुभाषराव कोठारे ,भाऊराव देवतळे , कविता पुण्यपकर , राधेश्याम गोबाडे , विलास गहूकर , चंदू सातपुते , नरेंद्र चिटमलवार तसेच विद्यार्थ्यांमधून अमित मलंगी , दिशांत तुरे , निर्मला साबळे , सिद्धू कोठारे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले .
सत्कारमूर्तीं प्रकाश निमकर यांनी सत्काराला उत्तर देताना म्हटले , मी तसे कोणतेही मोठे कार्य केलेले नाही केवळ मी माझ्या विद्यार्थ्यांचा हित जोपासण्याचा एक योग्य प्रयत्न केला व माझ्या कर्मचाऱ्यांसाठी एक माणूसची भावना जोपासली आणि याच कार्यामुळे सर्वांना मी एक खरा नायक असल्याची प्रचिती आली . परंतु यात खरंच तुमचा हा मोठेपणा आहे आणि मी सदैव तुमच्या ऋणाणतच राहू इच्छितो म्हणून भावी शिक्षकांनी सुद्धा माझ्यापेक्षाही योग्य रीतीने आपल्या ग्रामीण विद्यार्थ्यांचा हित जोपासण्याचा यथोचित प्रयत्न करावा असं मला आवर्जून सांगावेसे वाटते . कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्राध्यापक किशोर पोहनकर , प्रास्ताविक गजानन बारसागडे तर आभार पुरुषोत्तम गुरुनुले यांनी मानले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य करून कार्यक्रम बहारदार करण्यात मोलाचा वाटा उचलला .

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page