Friday, February 23, 2024
Homeगडचिरोलीराज्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये इंग्रजी माध्यमातून के.जी. टू पी.जी. चे शिक्षण सुरू करा--आ....
spot_img

राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये इंग्रजी माध्यमातून के.जी. टू पी.जी. चे शिक्षण सुरू करा–आ. डॉ. देवराव होळी यांची मागणी

इंग्रजी माध्यमाच्या आश्रमशाळात कायमस्वरूपी शिक्षकांची भरती करावी

दिनांक २ ऑगस्ट २०२३ गडचिरोली:-

राज्यात आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता केंद्र व राज्य सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आदिवासी विभाग तयार केला असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी सुद्धा उपलब्ध करून दिला आहे. या विभागाच्या माध्यमातून इंग्रजी माध्यमांच्या आश्रम शाळांमध्ये के.जी, पहिल्या वर्गापासून ते पोस्ट ग्रॅज्युएट (पि.जी.) पर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून देण्यात यावे अशी मागणी आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी विधानसभेत लक्षवेधी वरील चर्चेतून मंत्रिमहोदयांना केली. तसेच गडचिरोली जिल्ह्यात सुरू असणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या आश्रम शाळेमध्ये एकही कायमस्वरूपी शिक्षक नसल्याने कंत्राटी शिक्षकांच्या भरवशावर ती शाळा सुरू आहे त्यामुळे या शाळांमध्ये कायमस्वरूपी शिक्षक कधी भरणार असाही प्रश्न त्यांनी या माध्यमातून राज्य सरकारला केला.

त्यावर मंत्री महोदयांनी उत्तर देत या इंग्रजी माध्यमांच्या आश्रम शाळांमध्ये बारावी पर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तसेच इंग्रजी माध्यमांच्या आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती प्रक्रिया लवकरच राबवण्यात येईल असेही ते म्हणाले.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page