Sunday, February 25, 2024
Homeचंद्रपूरतहसील कार्यालय राजुरा येथे महसूल दीन साजरा
spot_img

तहसील कार्यालय राजुरा येथे महसूल दीन साजरा

उत्कृष्ट कर्मचारी व त्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार

राजुरा : – तहसील कार्यालय राजुरा येथे येथे महसूल दिनानिमित्त महसूल सप्ताह समारंभाला आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली (दि.१) सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी रवींद्र माने, राजुराचे तहसिलदार ओमप्रकाश गोंड, नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे, संजय चिंगलवार, विनोद डोणगावकर, चंद्रशेखर तेलंग, परिविक्षाधीन नायब तहसीलदार संजय दोडे उपस्थित होते.

यावेळी आमदार सुभाष यांनी सांगितले की, महसूल विभागाची नाळ ही शेतकरी व ग्रामीण जनता यांच्याशी जास्त जोडलेली असल्याने हा विभाग शासन आणि जनता यामधील महत्वाचा दुवा आहे, नैसर्गिक आपत्ती, निवडणूक व इतर वेळी महसूल विभागातील कर्मचारी नेहमीच कार्यतत्पर असतात. शासनाच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी व त्याचा लाभ जनतेला देण्यासाठी प्रशासनाणे जास्त कार्यतत्पर असणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

महसूल सप्ताह समारंभात सात दिवस घेतल्या जाणाऱ्या कार्यक्रमात पहिल्या दिवशी महसूल दीन, दुसऱ्या दिवशी युवा संवाद, तिसऱ्या दिवशी एक हात मदतीचा, चौथ्या दिवशी जनसंवाद, पाचव्या दिवशी सैनिक हो तुमच्यासाठी, सहाव्या दिवशी महसूल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संवाद, सातव्या दिवशी महसूल सप्ताह सांगता समारंभाचे आयोजन केले आहे. आयोजित कार्यक्रमात महसूल विभगतील उत्तम सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा व त्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला तसेच उत्कृष्ट मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला महसूल विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि त्यांचे गुणवंत विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page