Friday, February 23, 2024
Homeचामोर्शीबोरवेल सभोवताल चिखलाचे साम्राज्य
spot_img

बोरवेल सभोवताल चिखलाचे साम्राज्य

पंचायत समिती प्रशासन दखल घ्यावी
चामोर्शी:- तालुक्यातील वालसरा गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या भिवापुर येथील वार्ड क्रमांक ०१ मधील बंडू चलाख यांचे घराजवळील बोअरवेल सभोवताल चिखलाचे साम्राज्य पसरले असल्याने पाणी नेताना महिलांची दमछाक होत आहे त्याकडे ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करत आहे.
वालसरा गट ग्रामपंचायत अंतर्गत भिपापुर राजंनगट्टा कुंभरवाही हि गावे मिळून ०४ सदस्य तर वालसरा ०५ असे ०९ सदस्य संख्या असलेली गटग्रामपंचायात असून भिवापूर येथे चार सदस्य असताना येथील वार्ड क्रमांक ०१ मध्ये बंडू चलाख यांचे घराजवळ असलेल्या बोअरवेल सभोवताल चिखलाचे साम्राज्य पसरले आहे त्या बोअरवेल जाण्यासाठी महिलाना मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्यासाठी त्या वार्डातील नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनास व भिवापूर येथील संबधित सदस्यास वारंवार पाठपुरावा केला होता मात्र याकडे लक्ष न दिल्यामुळे त्या बोअरवेल सभोवताल चिखलाचे साम्राज्य पसरले आहे त्या बोअरवेल जवळ कसे जायचे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे, ते चिखलाचे साम्राज्य पासून मुक्ती केव्हा मिळणार अशीही विचारणा केली जात आहे ही नागरिकाची थट्टा थांबवावी अशी मागणी केली असून या मागणीची
पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी दखल घ्यावी अशी अपेक्षा महीला, नागरिक करीत आहेत.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page