Friday, February 23, 2024
Homeगडचिरोलीगोंडवाना विद्यापीठातिल विद्यार्थी अंकित चलाख याची अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी...
spot_img

गोंडवाना विद्यापीठातिल विद्यार्थी अंकित चलाख याची अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी निवड


गड़चिरोली :- स्थानिक गोंडवाना विद्यापीठात द्वितीय वर्षात शिकणारा अंकित दिलीप चलाख यांची सुंदरनगर हिमाचल प्रदेश येथे 5 ते 7 अगस्त दरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी विदर्भ टेनिस बॉल क्रिकेट संघात निवड झाली असून हा संघ दि. 3 अगस्त रोजी नागपूर वरून हिमाचल प्रदेश साठी रवाना होत आहे.

नागपुर येथे दी.17 ते 19 जून रोजी सम्पन्न झालेल्या राजस्तरीय क्रिकेट स्पर्धेत उत्तम कामगिरी करत अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी विदर्भ टेनिस बॉल क्रिकेट संघात स्थान प्राप्त केल.

सरदार पटेल महाविद्यालयात क्रीडा प्रशिक्षक प्रा डॉ विक्की पेटकर यांच्या प्रशिक्षणात आज पर्यंत विविध विद्यार्थ्यांनी विविध क्रीडाप्रकारामध्ये प्राविण्य प्राप्त केले आहे.
केवळरामजी हरडे महाविद्यालयातील क्रीडा प्रशिक्षक प्रा डॉ. महेश जोशी यांचा वेळोंवेळी मार्गदर्शन आणी मदती मुळे मला यश संपादन झाले आहे यात त्यांचा खूप मोलचा वाटा आहे

क्रिकेट सारखा खेळात अनेक खेळाडू सहभाग घेत असतात पण यात मला यश संपादन करने विक्की सर यांचा मार्गदर्शन व वारंवार मदती मुळे मला हे यश मिळण्यास यांचा सुद्धा मोलाचा वाटा आहे
या विद्यार्थ्याचा अखिल भारतीय स्तरावरील सहभागामुळे क्रिकेट खेळ गडचिरोली सारख्या ग्रामीण भागात प्रचलित होण्यास मदत मिळेल असा विश्वास यांनी व्यक्त केला.
विद्यार्थ्यांनच्या निवडीबद्दल चंद्रपुर सिटी टेनिस बॉल क्रिकेट एसोसिएशन चे अध्यक्ष प्रा डॉ. अनीस खान व,सचिव प्रा.डॉ विक्की पेटकर आणि सर्व सदस्याणी यांनी अभिनंदन केले आहे.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page