Saturday, February 24, 2024
Homeचामोर्शीसुधीर भाऊ शब्दाला जागणारा नेता---------------------------------रामपुर येथे स्वाभिमान महिला बचत गट भवनाला ५०...
spot_img

सुधीर भाऊ शब्दाला जागणारा नेता———————————रामपुर येथे स्वाभिमान महिला बचत गट भवनाला ५० लक्ष रु. मंजुर

बचत गटाच्या महिलांनी पालकमंत्री ना. सुधीरभाऊचे मानले आभार: माजी आमदार निमकर यांच्या पाठपुराव्याला यश

राजुरा :- रामपूर येथिल ग्रामपंचायत च्या दि.५ मे रोजी स्थापना दिनाच्या कार्यक्रमात राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य, मत्स्यव्यवाय मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री ना. सुधिरभाऊ मुनगंटीवार यांना माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी महिलांच्या वतीने रामपूर येथे बचत गट भवन बांधकामा करीता ५० लक्ष रु. मंजुर करण्याची मागणी केली होती. केलेल्या मागणीनुसार ग्रामपंचायत रामपूर येथिल महिला बचत गटाच्या भवनाचे बांधकाम करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ मुंबई च्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. इंदू जाखड आय.ए.एस. यांना दिलेल्या निर्देशानुसार त्यांनी त्यांचे पत्र क्र.माविम/प्रकल्प/2023/155 दि.7 जुलै रोजी मान्यता दिली. सदर कामास नुकताच दि.18 जुलै रोजी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२३-२४ प्रशासकीय मान्यता व निधी वितरण आदेश जिल्हा नियोजन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथून निर्गमित झाला आहे. या माध्यमातून रामपूर येथिल बचत गटाच्या महिलांना लघू उद्योग करण्यास हक्काचे स्थान निर्माण होणार आहे. पालकमंत्री ना. सुधिरभाऊ मुनगंटीवार यांनी महिलांना दिलेला शब्द पुर्ण केल्यामुळे महिलांनी त्यांचे शब्दाला जागणारा नेता म्हणून आभार मानले आहे.

5 मे च्या कार्यक्रमात ना. सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे बचत गट भवनाची मागणी करणारे माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्याकडे या कामाचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी सोपविली होती. माजी आमदार नीमकर यांनी ग्रामपंचायत सोबत संपर्क साधून मोक्याच्या ठिकाणी मुख्य मार्गालगत बांधकामा करिता जागा उपलब्ध करून घेतली व आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता करून, सातत्याने प्रशासकीय अधिकारी यांच्या सोबत वेळोवेळी संपर्क ठेऊन मान्यता मिळउन घेतली. विशेषतः या कामाकरीता पालकमंत्री ना. सुधिरभाऊ यांच्या कार्यालयातले कर्तव्यदक्ष विशेष कार्य अधिकारी श्री इंगोले यांनी मोलाचे सहकार्य केले. महिलांना दिलेल्या शब्दाला जागत पालकमंत्री ना. सुधिरभाऊ मुनगंटीवार यांनी अवघ्या दोन महिन्यात 50 लक्ष रु. महिला बचत गट भवनाला मंजुर केल्याबद्धल ना.सुधिरभाऊ चे महिला बचत गटाच्या वतीने रामपूर ग्रा.पं. सरपंच वंदना गौरकार, सुमनताई बोबडे, उपसरपंच सुनिता उरकुडे, माजी उपसरपंच तथा सदस्य हेमलता ताकसांडे, स्वाभिमान ग्रामसंघ बचत गटाच्या अध्यक्ष संध्या हरीहर, चंदा जेटमल, शितल पाचभाई, मिना वांढरे, गिता येमलकुर्तेवार, शितल रागीट, स्नेहल देरकर, कविता थोरात, अर्चना बिजवे, अनिता हरिहर व स्वाभिमान ग्रामसंघ महिला बचत गटाच्या महिलांनी आभार मानले.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page