Saturday, February 24, 2024
Homeचामोर्शीमहाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाकडून सिनेअभिनेत्री प्रतिक्षा शिवणकरचे चामोर्शी नगरीत जंगी स्वागत
spot_img

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाकडून सिनेअभिनेत्री प्रतिक्षा शिवणकरचे चामोर्शी नगरीत जंगी स्वागत

चामोर्शी:- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा गडचिरोली च्या वतीने चामोर्शी नगरीत प्रथम आगमनाप्रित्यर्थ सिने अभिनेत्री प्रतिक्षा शिवणकर हिचा सत्कार समारंभ व कौतुक सोहळा चामोर्शी येथील प्राथमिक शिक्षक सहकारी कर्मचारी पतसंस्थेच्या सभागृहात दिनांक:-२६/०७/२०२३ ला आयोजित करण्यात आला . जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असलेल्या श्री सुनिल शिवणकर व सौ.भारती सुनिल शिवणकर या शिक्षक दांपत्याची प्रतिक्षा शिवणकर हि जेष्ठ कन्या‌ असुन तिने गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी सारख्या दुर्गम भागात शिक्षण घेऊन मराठी नाट्य सृष्टीत, सिनेमात व जिवाची होतीया काहिली यांसारख्या लोकप्रिय टि.व्ही.मालिकेत मुख्य नायिकेची भुमिका साकारणा-या प्रतिक्षा शिवणकर चे चामोर्शी नगरीत प्रथम आगमन प्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा गडचिरोली च्या वतीने शाल, श्रीफळ, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले . या स्वागत व सत्कार सोहळा प्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री रघुनाथ भांडेकर,जिल्हाकार्याध्यक्ष शिलाताई सोमनकर, जिल्हा सल्लागार सिताराम भोयर, शिक्षक संघाचे मार्गदर्शक केंद्रप्रमुख राजेश कोत्तावार,हेमंत चावरे,महिला संघटिका भारती शिवणकर,सत्कारमूर्ती सिने अभिनेत्री प्रतिक्षा शिवणकर, जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव रायसिडाम,अशिमकुमार बिश्वास,किशोर कोहळे,मारोती वनकर, सिद्धार्थ सोरते, प्रशांत पोयाम, सुजित दास,रुषीदेव कुनघाडकर, सुनिल सातपुते,अशोक जुवारे,नारायण मलीक,सविता उराडे, श्रीमती रामटेके,किर्ती सिंगरुरवार, गडकर, कमलाकर कोन्डावार, दिगंबर देवकते, पतसंस्थेचे व्यवस्थापक रविंद्र श्रीकोंडावार, अब्दागिरे, चोले ,दिलीप बुरांडे, बंडावार, बंडु चिळंगे, बालाजी पवार, गेडाम , भैसारे , वैद्य, भोयर , नरोटे यासह असंख्य मान्यवर मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रघुनाथ भांडेकर यांनी केले.मार्गदर्शन सत्कारमुर्ती प्रतिक्षा शिवणकर,प्रमुख अतिथी राजेश कोत्तावार,शिलाताई सोमनकर,सिताराम भोयर,भारती शिवणकर यांनी केले.तर यशस्वी सुत्रसंचलन मारोती वनकर यांनी केले आणि कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर यांचे आभार किशोर कोहळे यांनी मानले.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page