Sunday, February 25, 2024
Homeचामोर्शीजिल्हा परिषद केंद्र शाळा चामोर्शीची माजी विद्यार्थिनी प्रसिद्ध सिने सिनेअभिनेत्री प्रतीक्षा शिवणकरची...
spot_img

जिल्हा परिषद केंद्र शाळा चामोर्शीची माजी विद्यार्थिनी प्रसिद्ध सिने सिनेअभिनेत्री प्रतीक्षा शिवणकरची केंद्र शाळा चामोर्शीला भेट


चामोर्शी :-
जिल्हा परिषद केंद्र शाळा चामोर्शीची माजी विद्यार्थी सिने अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकर हिने केंद्र शाळेत भेट देऊन सर्व विद्यार्थ्यांशी हितगुज साधला.”आपण ज्या नायिकेला मालिकेत विविध प्रसिद्ध भूमिका करताना केवळ टीव्हीवर पाहतो ती आज प्रत्यक्ष शाळेत आल्यावर सर्व विद्यार्थ्यांना सुखद आश्चर्याचा धक्का बसला . शाळेतील सर्वच विद्यार्थी प्रतीक्षाचा ऑटोग्राफ घेण्यासाठी उत्सुक होते. प्रतीक्षाणे प्रत्यक्ष वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. केंद्र शाळा चामोर्शीच्या वतीने प्रतीक्षा शिवणकर हिचे शाल, श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक उपस्थित होते.विशेष म्हणजे यापूर्वी जिल्हा परिषद केंद्र शाळा चामोर्शी येथे शिक्षक पदावर कर्तव्य बजावणाऱ्या प्रतीक्षाची आई भारती शिवणकर सुद्धा उपस्थित होत्या.
शाळेमुळे आत्मविश्वास मिळाल.●
“या शाळेत माझे प्राथमीक शिक्षण पूर्ण झाले.या शाळेत मला आत्मविश्वास मिळालं. इयत्ता चौथी पर्यँत शिक्षण घेताना भाषण स्पर्धा,नृत्य स्पर्धेत भाग घेण्याची संधी मला मिळाली.ज्यामुळे माझे व्यक्तिमत्व घडले. ही शाळा माझ्या नेहमी स्मरणात राहील.जीवनात मोठे स्वप्न पाहिलेच पाहिजे आणि ते स्पप्न सत्यात उतरविण्यासाठी धडपडही केली पाहिजे. हिरोईन वगैरे बनण्याचे माझेही स्वप्न होते. अभिनयाची आणि नृत्याची आवडही आधीपासून होती. मी प्रयत्न केले आणि त्याला योग्य दिशा मिळाली.आई-वडीलांचे कायम पाठबळ आणि कोणतीही गोष्ट माझ्यावर न लादता मला माझे करिअर निवडण्यासाठी दिलेले प्रोत्साहन यामुळेच मी हा आतापर्यंतचा अभिनयाचा प्रवास करू शकले” असे प्रतीक्षा सांगते.
आई-वडील प्राथमिक शिक्षक●
जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षक असलेल्या सुनील आणि भारती शिवणकर या शिक्षक दाम्पत्याची प्रतीक्षा ही ज्येष्ठ कन्या. चवथीपर्यंतचे शिक्षण जि.प.केंद्र शाळा चामोर्शी येथे तर दहावीपर्यंतचे शिक्षण तिने चामोर्शीतील शिवाजी हायस्कूलमधून घेतले. बारावी चंद्रपूरवरून आणि ग्रॅज्युएशन नागपूरच्या आंबेडकर कॉलेजमधून पूर्ण केल्यानंतर प्रतीक्षा स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुण्यात गेली. तिथेच अभिनय, नृत्याच्या हौसेने तिला आधी व्यावसायिक रंगभूमी आणि आता छोट्या पडद्यावर पोहोचविले.
पुण्यात आली अन् जीवनाला कलाटणी मिळाली●
स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना पुण्यात प्रशांत दामले यांच्या संस्थेत ऑडिशन दिली. त्यात ती पास झाली. ३ महिन्याच्या प्रशिक्षणानंतर तिच्यातील टॅलेंट पाहून पुन्हा एक वर्षांचे प्रशिक्षण तिला निःशुल्क देण्यात आले. पुढे दामले यांनीच तिला नाटकाची ऑफर दिली.प्रशांत दामले यांच्यासोबत प्रतीक्षाने ‘एका लग्नाच्या पुढची गोष्ट’*या नाटकाचे देश-विदेशात ५०० प्रयोग केले. नाटकात काम केल्यानं प्रतीक्षाचा आत्मविश्वास दुणावला. त्यानंतर प्रतीक्षानं ‘कॉलेज डायरी नावाचा सिनेमा देखील केलाय. लॉकडाऊन नंतर तिने ‘कॉमेडी-बिमेडी’ नावाचा शो देखील केलाय.सोनी मराठी चॅनेल वरून प्रसिद्ध होणाऱ्या जीवाची होतीय काहिली’ मालिकेचे जेव्हापासून प्रोमो यायला सुरुवात झाली तेव्हा ही अभिनेत्री कोण ? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला. या मालिकेत प्रतीक्षा शिवणकर ही मुख्य नायिका रेवतीची भूमिका साकारत आहे. गडचिरोली सारख्या दुर्गम भागात शिक्षण घेऊन आपल्या स्वप्नांना प्रत्यक्ष साकारण्यासाठी प्रचंड मेहनत घेऊन मराठी नाट्यसृष्टीत,सिनेमात व ‘जीवाची होतीया काहिली या सारख्या लोकप्रिय टीव्ही मालिकेत मुख्य नायिकेची भूमिका साकारणाऱ्या प्रतीक्षाची केंद्र शाळा चामोर्शीला माजी विद्यार्थिनी म्हणून अभिमान आहे.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page