Sunday, February 25, 2024
Homeचामोर्शीयशोधरा विद्यालयात अंधश्रध्देवर प्रबोधन
spot_img

यशोधरा विद्यालयात अंधश्रध्देवर प्रबोधन

चामोर्शी :- स्थानिक यशोधरा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चामोर्शी येथे अंधश्रध्देवर प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती चे कार्यकर्ते किशोर पातर यांनी वेगवेगळे प्रात्यक्षिक सादर करून समाजामध्ये असणाऱ्या अंधश्रद्धा कशा चुकीच्या आणि शोषण करणाऱ्या आहेत हे सिद्ध केले आणि समाजात असणाऱ्या बुवा बाबांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. अध्यक्षिय भाषणात प्राचार्य शाम रामटेके यांनी समाजातील अंधश्रद्धा नाकारून , बुवा बाबांच्या नादी न लागता विद्यार्थ्यांनी स्वतः मधे वैज्ञानीक दृष्टिकोन रुजवावा आणि स्वतःची प्रगती करावी असे आव्हान केले. संचालन जयश्री कोठारे व आभार प्रदर्शन सरिता वैद्य यांनी केले .यावेळी राजू धोडरे , प्रविण नैताम, गुरु सातपुते, कुसुम सावसाकडे, साजेदा कुरेशी , सुधाकर भोयर, लक्ष्मण गव्हारे, यासह विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page