Sunday, February 25, 2024
Homeगडचिरोलीछप्पर उडत असलेल्या व्हायरल बसच्या प्रकरणात विभागीय यंत्र अभियंता निलंबित
spot_img

छप्पर उडत असलेल्या व्हायरल बसच्या प्रकरणात विभागीय यंत्र अभियंता निलंबित

पंकज नौनुरवार ता प्र.

अहेरी :- गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आगाराची बस क्रमांक एम एच 40 वाय ५४ ९४ ही गडचिरोली मुलचेरा मार्गे अहेरी या मार्गावर धावत असताना वाहकाच्या बाजूकडील बसचे छत पूर्णपणे उघडून हवेत उडत असल्याचे चलचित्र विविध समाज माध्यमांत व वृत्तवाहिन्यांवर दाखविण्यात आले या संदर्भात सदर बसचे दुरुस्तीचे काम विभागीय कार्यशाळेमध्ये विहित वेळेत न केल्याने संबंधित विभागाचे यंत्र अभियंता श्री श्री विराजदार बिराजदार विभागीय यंत्र अभियंता गडचिरोली यांना निलंबित करण्यात आले आहे प्रवासी वाहनाचे काम विहित वेळेत पूर्ण न करणे तसेच सदर वाहन त्रुटीसह प्रवासी वाहतुकीसाठी रस्त्यावर उपलब्ध करून देणे त्यामुळे जनमानसात एसटी महामंडळाची प्रतिमा मलिन होणे या कारणास्तव श्री विराजदार यांना जबाबदार धरून पुढील चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे
यापुढे वाहनाची दुरुस्ती अथवा वाहन बांधणीतील त्रुटी न काढता कोणतेही वाहन प्रवासी वाहतुकीसाठी न वापरण्याचा सूचना राज्यातील सर्व स्थानिक एसटी प्रशासनाला देण्यात आल्या आहेत प्रवाशांची सुरक्षितता याला सर्वोच्च प्राधान्य देऊन तसेच मार्गस्थ कराव्यात असे निर्देश अभिजीत भोसले जनसंपर्क अधिकारी यांनी सर्व आभार व्यवस्थापकांना देण्यात आले आहे.

कोट :-
मी अहेरी आगारात मागील माहे फरवरी 2023 ला रुजू झाले असून तेव्हापासून अहेरी आगारातील भंगार बसेसची दुरुस्ती करिता वारंवार वरिष्ठ कार्यालयात पत्रव्यवहार करण्यात आलेले आहे परंतु वरिष्ठ स्तरावरून पुढील कारवाई होऊ न झाल्याने अहेरी आगारातील बसेस भंगार अवस्थेत आहेत. अहेरी आगारात एकूण 81 बसेस आहेत त्यात मानव विकास विकासच्या एकूण 42 बसेस आहेत. छत उडालेल्या बस हे चंद्रपूर येथील विभागीय कार्यशाळेत सकाळी पाच वाजता दुरुस्ती करिता रवाना करण्यात आले आहे. अहेरी ते सिरोंचा आणि अहेरी ते आष्टी हा मार्ग अतिशय खराब असलेल्या रोडमुळे बसेस भंगार झाले आहेत .

  • चंद्रभूषण घागरगुंडे,
    आगार व्यवस्थापक अहेरी

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page