Friday, February 23, 2024
Homeगडचिरोलीलोकांच्या आरोग्याशी खेळणार्या ग्रामपंचायत वर कारवाई करा--गावकऱ्यांची मागणी
spot_img

लोकांच्या आरोग्याशी खेळणार्या ग्रामपंचायत वर कारवाई करा–गावकऱ्यांची मागणी


दिवाकर भोयर धानोरा ता. प्र.:- रांगी येथिल नळ योजनाचा पाणी पुरवठा भरपावसाळ्यात मागिल सात दिवसापासून बंद असल्याने बिना बिल्चिंग केलेले दुषित पाणी लोकांना विहिर व बोरवेलचे प्यावे लागत असल्याने गावकऱ्यांच्या आरोग्याशी खेळनार्या ग्रामपंचायत वर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
सध्या शेतीचा हंगाम सुरू असल्याने गावातील महिला व पुरुष शेतिच्या कामात व्यस्त असताना गावातिल नळाचा पाणी पुरवठा ट्राँसफार्मर जळाल्याने बंद आहे.याचा त्रास महिलांना होतोय. गावात नळ योजना असल्याने गावातील विहिरी व हातपंपात बिल्डिंगंचा वापर केला नाही.पावसाळ्याच्या दिवसात दुषित पाणी पिल्याने लोकांच्या आरोग्यावर परिणाम झाल्यास जबाबदार कोण?
धानोरा तालुक्यातील रांगी येते लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्यासाठी शासनाने नळ योजना कार्यान्वित करण्यात आली.पण हिच नळ योजना ट्रासफार्मर जळालाने मागिल सात दिवसापासून बंद असल्याने येथिल ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागत आहे.ऐन पावसाळ्याच्या दिवसात महिलांना शेतीकामात व्यस्त असताना पिण्याच्या पाण्यासाठी ताटकळत बसावे लागते.त्यातच दुषित पाणी प्यावे लागत असल्याने.याचाही परिणाम लोकांच्या आरोग्यावर होनार असल्याची प्रतिक्रिया गावकरी देत आहेत.
ग्रामपंचायत कडुन सात दिवसापासून पाणी पुरवठा बंद आहे. ते जर येवढं दिवस बंद राहणार आहे याची कल्पना ग्रामपंचायतला असेल तर प्रथम गावातिल विहिरी व हातपंपात बिल्डिंगं पावडर टाकून पाणी स्वच्छ करायला पाहिजे होते.पण ते ग्रामपंचायत ने केले नाही.त्यामुळे गावकऱ्यांना पावसाळ्यात तसेच पाणी प्यावे लागत आहे.अजुन पर्यंत नळाद्वारे मिळनार्यी पाण्यासाठी किती दिवस वाट पहावे लागनार ?.जेवढे दिवस लोकांना पाणी मिळणार नाही तेवढे दिवसांचे ग्रामपंचायत पाणी कर कमि करनार आहे का?
याबाबत संबंधित सचिवांनी वेळीच कारवाई करुन ट्राँसफार्मर लावुन गावकऱ्यांना पिण्यासाठी ‌पाणि नियमित नळाद्वारे देने गरजेचे ‌असतांनाही सदर कामात हयगय करणार्या व्यक्तिवर कारवाई होईल काय असाही प्रश्न गावकरी विचारीत आहेत.
जळलेला ट्रासफार्मर आज बदलविन्यात आले आहे.२४तास चार्जिंग झाल्यानंतर नळाचे पाणी गावातिल नळाला सोडले जाईल अशी प्रतिक्रिया सरपंच सौ. फालेश्वरीताई प्रदिप गेडाम यांनी सांगितले.संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page