Friday, February 23, 2024
Homeचामोर्शी'मराशीप ' सहविचार सभेत विविध विषयांवर चर्चाशिक्षणाधिकारी यांना निवेदन
spot_img

‘मराशीप ‘ सहविचार सभेत विविध विषयांवर चर्चाशिक्षणाधिकारी यांना निवेदन


चामोर्शी :- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद या संघटनेची सहविचार सभा शिक्षणाधिकारी यांच्या दालनात २४ जुलै रोजी घेण्यात आली.सभेत विविध विषयांवर चर्चा करून शिक्षणाधिकारी (माध्यमिक , प्राथमिक ) यांच्या वतीने शासनास जुनी पेन्शन बाबत निवेदन देण्यात आले.
सभेत खालील विषयांवर चर्चा झाली त्या समस्या सोडवण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद या संघटनेच्या वतीने करण्यात आली.
दरमहा एक तारखेस वेतन मिळावे, भविष्य निर्वाह निधीची हिशोब पत्रिक दरवर्षी
जून अखेर पर्यंत मिळावीत.
वैयक्तिक मान्यता, वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणीच्या मान्यता, पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक या पदोन्नतीच्या मान्यता भविष्य निर्वाह निधीची
कर्ज प्रकरण, विनापरतावा प्रकरणे, अंतिम परतावा प्रकरणे, डीएड वेतनश्रेणीतून बीएड वेतन श्रेणी पदोन्नती प्रस्तावांचा निपटारा दाखल दिनांक पासून एक महिन्याच्या आत व्हावे.
सेवानिवृत्ती प्रस्तावाचा निपटारा दरमहा तत्परतेने करावा.
वैद्यकीय प्रतिपूर्ती प्रकरणे अतिशय संवेदनक्षम पद्धतीने व तातडीने मंजूर करावी.
सेवा जेष्ठता क्रम निश्चिती प्रकरण आवश्यकतेनुसार सुनावणी घेऊन दाखल दिनांक
पासून एक महिन्यात निकाली काढावीत.
शिक्षक पाल्य शैक्षणिक शुल्क परतावा प्रकरणे दाखल दिनांकापासून एक महिन्यात
निकाली काढावीत.
प्रभारी मुख्याध्यापक मान्यता जास्तीत जास्त सहा महिन्याचे असावे व जास्तीत जास्त तीन महिने प्रमाणे दोन वेळा देण्यात यावे.
सेवा हमी कायदा २०१५ अन्वये शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयाची
अंमलबजावणी तंतोतंत करावी.
प्रत्येक शिक्षकास सेवाजेष्ठता यादीची दरवर्षी सुधारित केलेली प्रत दिनांक ३० जून
पूर्वी मिळावी.दप्तर दिरंगाई विरोधी कायद्याची अंमलबजावणी सुद्धा तत्परतेने करावी.
प्रत्येक मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तरास सेवा पुस्तकाची दुय्यम प्रत उपलब्ध करून द्यावी.
प्रत्येक प्रशालेच्या मुख्याध्यापकाकडून प्रत्येक शिक्षकास खालील कागदपत्रांच्या त्यांच्या सहीने साक्षांकित केलेल्या सत्यप्रती मिळावी, नेमणूक आदेश, वैयक्तिक मान्यता, वरिष्ठ वेतनश्रेणी मान्यता, निवड श्रेणी मान्यता बदली मान्यता, सेवा जेष्ठता यादीची प्रत,मासिक वेतन हिशोब पत्रिका, (मासिक पे स्लीप), मासिक
विविध रजा हिशोब पत्रिका.
प्रत्येक शिक्षकास वैयक्तिक मान्यता वरिष्ठ वेतनश्रेणी मान्यता निवड श्रेणी मान्यता
इत्यादी मान्यतेच्या प्रति थेट संबंधित शिक्षक व शिक्षकेतरास मिळावी.
शिक्षणाधिकारी कार्यालयातील सर्वच अधिकारी व सेवकावर लिपिकावर
निर्धारित केलेली कामे कोणती आहेत हे स्पष्ट करणारा बोर्ड कार्यालयाबाहे लावावा.
वैयक्तिक मान्यतेचे सर्वच प्रकारचे प्रस्ताव कोणत्या विहित नमुन्यात सादर करावेत व त्यासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडावीत याची संकलित हस्तपुस्तिका तयार करून प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकास उपलब्ध करून द्यावे.
शिक्षणाधिकारी कार्यालय पत्रव्यवहार इमेल द्वारेच करण्यात यावा.
शिक्षणाधिकारी कार्यालयांत येणाऱ्या संघटना पदाधिकारी कार्यकर्त्यांना व शिक्षक कर्मचारी याना सन्मानजनक वागणूक मिळावी.
संघटना सहविचार सभा नियमितपणे आयोजित कराव्यात व कार्यवाही सुध्दा
तत्परतेने करावी.
संघटना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना योग्य तो सन्मान द्यावा.
आयत्या वेळेचे विषय.
वैयक्तिक विषय:-
रेवन वासुदेव बोरकुटे,(सहा.शिक्षक) राणी दुर्गावती कन्या विद्यालय गडचिरोली
यांना भार मुक्त करण्यात न आल्याबाबत.
मंगेश योगेश्वर कोतपल्लीवार (सहाय्यक शिक्षक) कर्मवीर विद्यालय आमिर्झा
तालुका जिल्हा गडचिरोली यांचे वैयक्तिक मान्यता प्रपत्र ‘ ब’ मध्ये मान्यतेच्या दिनांकात दुरुस्ती करून देण्याबाबत.
एपीएसधारक कर्मचारी सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना कुटुंब
निवृत्ती वेतन आणि सेवा उपदान मंजूर केल्याबाबतच्या कार्यवाही या समस्याचा समावेश आहे यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हाध्यक्ष संतोष सुरावार , जिल्हकार्यवाह गोपाल मुनघाटे , तालुकाध्यक्ष अतुल सुरजागडे , सह जिल्हापदाधिकारी व तालुका पदाधिकारी सर्व उपस्थित होते.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page