Friday, February 23, 2024
Homeचंद्रपूरराजुरा शहरातील गोळीबार प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करा--राजू झोडे
spot_img

राजुरा शहरातील गोळीबार प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करा–राजू झोडे


तालुका प्र. राजुरा:- चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा गुन्हेगारीने डोकं वर काढले असून राजुरा तालुक्यातील सोमनाथपुर वार्डात अवैध कोळसा तस्करी प्रकरणातून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री उघडकीस आली आहे.या घटनेत एका महिलेचा नाहक बळी गेला.या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून अटकेत असलेल्या दोन आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करावी व वाढत असलेली गुन्हेगारी ठेचून काढावी अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी आहेत.याच कोळसा खाणीतून मागील अनेक दिवसांपासून अवैध कोळसा तस्करी सुरू असून राजकीय पार्श्वभूमी असलेल्या काही तस्करांकडून कोळसा तस्करी जोमात सुरू आहे. राजुरा, साखरी, पैनगंगा, सास्ती,मुंगोली अशा सर्वच कोळसा खाणीत परप्रांतीय गुंड प्रवृत्तीच्या काही इसमाकडून हे काम सर्रास सुरू आहे.यातूनच जिल्ह्यात गुन्हे घडत असून पोलीस प्रशासनाच्या नाकावर टीच्चून बंदुका,सुरे, लाठ्या काठ्याचा धाक दाखवून कोळसा तस्करी सुरू आहे.

गुंडप्रवृत्तीच्या लोकांना प्रशासनाचा कुठलाही धाक राहिला नसून मागील अनेक दिवसांपासून राजकीय व आर्थिक वर्चस्वासाठी कोळसा तस्करी अनेक वर्षापासुन सर्रास सुरू आहे. अशातच रविवारी राजुरा शहरात सचिन डोहे यांच्या घरी अज्ञात आरोपींनी गोळीबार केला.यात त्यांच्या पत्नी पूर्वशा डोहे यांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी आहे.त्यामुळं जिल्ह्यात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढले असून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी घटनेची गांभीर्याने चौकशी करून आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करावी, कोळसा खाणीत कार्यरत असलेल्या खासगी कंपनीतील कामगारांची चारित्र्य पळताळणी करावी, बंदुकीच्या परवान्यांची चौकशी करावी अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी कडक कायदा करावा अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी केली आहे.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page