Saturday, February 24, 2024
Homeगडचिरोलीमोटारसायकल व रोख रक्कम पळवून नेणारा सराईत गुन्हेगार आरमोरी पोलिसांच्या जाळ्यात
spot_img

मोटारसायकल व रोख रक्कम पळवून नेणारा सराईत गुन्हेगार आरमोरी पोलिसांच्या जाळ्यात


आरोपीवर अनेक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल
सराईत आरोपी लिफ्ट मागून करायचा गुन्हा
आरमोरी-जिल्ह्यातील अनेक पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमाद्वारे गुन्हे दाखल असणाऱ्या सराईत गुन्हेगारास आरमोरी पोलिसांनी कसून शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्याची घटना निदर्शनास आली.
प्रकाश आनंदराव मेडपल्लीवार वय-३० वर्षे, रा. चाकलपेठ ता. चामोर्शी जि. गडचिरोली असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर जिल्ह्यातील अनेक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत.
प्राप्त माहितीनुसार यातील फिर्यादी नामे- नीलकंठ उरकुडा प्रधान वय – ४० वर्षे, धंदा- शेती रा. ता. ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर यांनी दिनांक १८/०७/२०२३ रोजी पो.स्टे. ला येवून तोंडी रिपोर्ट दिली की, मी दिनांक- १६/०७/२०२३ रोजी सकाळी अंदाजे ११.३० वाजता दरम्यान शेतीचे पिकावरील फवारणीची औषधी घेण्याकरिता माझ्या जुनी MH-34 AE- 7607 या हिरो होंडा कंपनीची सि.डी डीलक्स या मोटारसायकलने आरमोरीकडे निघालो. माझेकडे पुरेसे पैसे नसल्याने गुरुदेव बगमारे रा. रुई याचे मौजा खरकाटा फाटा येथील पानटपरि असल्याने त्याचे कडून १६,००० रुपये रोख घेऊन आरमोरी कडे जाण्यास निघालो असता, पानठेलावर उभा असलेला अनोळखी इसम(आरोपी) त्याने मला पण आरमोरीला जायचं आहे असे सांगून मला लिफ्ट मागितली. पावसाचे वातावरण असल्याने माझेकडे असलेला lava कंपनीचा साधा मोबाईल किमत १०००/- रुपये व माझेकडे असलेले १६,०००/- रुपये गाडीचे डिक्कीत ठेऊन त्यासोबत निघालो. अरसोडा फाट्या जवळील सावजी धाब्याजवळ गाडी थांबऊन गाडीला चाबी लावून ठेऊन लघवी करत असतांना त्या अनोळखी इसमाने(आरोपीने) माझी नमूद गाडी अंदाजे किंमत १५,०००/- रुपये तसेच माझा मोबईल १०००/- रुपये तसेच १६,०००/- रुपये रोख असा एकूण ३२,०००/- रुपये चा माल त्या दि. १६.०७.२०२३ चे १२.३० वा दरम्यान चोरून घेऊन गेला. अशा प्रकारची तक्रार फिर्यादीने दिनांक १८ जुलै रोजी पोलीस स्टेशनला दिली. आरमोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप मंडलिक यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक तयार केला.
घटनेच्या दिवशी सदर सराईत आरोपीने फिर्यादीच्या मोबाइलवरून चंद्रपूर येथील एका व्यक्तीस फोन केला होता.आरमोरी पोलिसांनी लोकेशन ट्रेस करून चंद्रपूर येथील व्यक्तीला बोलते केले असता त्त्याने माझे मोबाईल वर नामे- प्रकाश आनंदराव मेडपल्लीवार रा. चाकलपेठ ता. चामोर्शी जि. गडचिरोली याने फोन केले होते. असे सांगितले.आरमोरी पोलिसांनी वेळ न दवडता ठाणेदार संदीप मंडलिक यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सचिन भिलारी,सहा. पो.उपनिरीक्षक चिकणकर व त्यांच्या पथकाने सराईत आरोपी प्रकाश मेडपल्लीवार यास त्याच्या चाकलपेठ या गावून त्याला दिनांक २२ जुलैला सायंकाळी सव्वा सहा वाजता अटक केली. तसेच यातील फिर्यादी याने नमूद आरोपीस ओळखिले. त्यावरून सदर गुन्ह्यात नमूद आरोपीचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. आरमोरी पोलिसांनी सदर सराईत आरोपी याच्यावर भांदवी ३७९ कलमाद्वारे गुन्हा दाखल केला.सदर गुन्ह्याचे तपासात आरोपीस विचारपूस केले असता तो उडवा उडवीचे उत्तरे देत असल्याने आरमोरी पोलिसांनी त्यास न्यायालयात हजर केले असता आरोपी मेडपल्लीवार यास दिनांक २४ जुलैपर्यंत १ दिवसाची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. आरोपी प्रकाश मेडपल्लीवार यांचेवर गडचिरोली, पेंढरी,वडसा, आरमोरी, आदी पोलीस ठाण्यात विविध कलमाद्वारे गुन्हे नोंद असून तो सराईत गुन्हेगार आहे.सदर आरोपी हा आरमोरी पोलिसांच्या जाळ्यात सापडल्याने त्याने आतापर्यंत केलेले अनेक गुन्हे उजेडात येण्याची दाट शक्यता आहे.सदर आरोपी हा कमी भावात डिझेल, पेट्रोल आणून देण्याचे आमिष शेतकऱ्यांना दाखवून त्यांची गाडी व पैसे घेऊन पोबारा करतो.अशा व्यक्तींपासून शेतकऱ्यांनी सावध राहण्याचे आवाहन ठाणेदार संदीप मंडलिक यांनी केले आहे.
अधिक तपास आरमोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप मंडलिक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन भिलारी, स.पो.उपनिरीक्षक गौतम चिकणकर,पो.ना.ताटपलंग करीत आहेत.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page