Sunday, February 25, 2024
Homeचंद्रपूरआठवड्या भरापासून शाळकरी विद्यार्थी, रुग्णांचे व शेतकऱ्यांचे बेहाल
spot_img

आठवड्या भरापासून शाळकरी विद्यार्थी, रुग्णांचे व शेतकऱ्यांचे बेहाल

रपटा वाहून गेल्याने गोवरी -राजुऱ्याचा संपर्क तुटला .

पालकांनी व विद्यार्थ्यांनी केले आंदोलन.

बादल बेले तालुका प्रतिनिधी राजुरा:- तालुक्यातील गोवरी गावाजवळ असलेल्या मोठ्या नाल्यावरील पुलाचे बांधकाम पावसाळा सुरू झाल्यानंतरही पूर्ण झाले नाही.त्यामुळे वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आलेला रपटा मागच्या आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे पुरात वाहून गेला. त्यामुळे मागील आठ दिवसापासून शाळकरी विद्यार्थी, रुग्णांचे व शेतकऱ्यांचे बेहाल झाले आहेत. नाल्यातून गावकऱ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू झाला आहे. संतप्त नागरिकांनी व पालकांनी आज दिनांक 24 जुलैला विद्यार्थ्यांसोबत आंदोलन केले व कंत्राटदाराचा निषेध नोंदविला.
आंदोलनात गोवरी येथील भास्कर पाटील जुनघरी, पोवनीचे सरपंच पांडुरंग पाटील पोटे, नामदेव पाटील देवाडकर व गावातील नागरिक सहभागी झाले होते.
मागील आठ दिवसापासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. बसेस बंद आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना शहरात शिकण्यासाठी ये-जा करणे बंद झालेले आहे. शिवाय गोवरी येथे शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचाही मार्ग बंद आहे. गावातील रुग्णांचे बेहाल आहेत. उपचारासाठी राजुरा आहे ते जाणे अतिशय जिकरीचे झालेले आहे .त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे. रुग्णांना उपचार घेणेही कठीण झालेले आहे.

गोवरी गावाजवळ असलेल्या मोठ्या नाल्यावर पुलाचे बांधकाम पावसाळ्यातही सुरू आहे. त्यामुळे जुना पुल तोडून नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे.त्यामुळे वाहतुकीसाठी तात्पुरता स्वरूपाचा रपटा नाल्यात तयार करण्यात आला. त्यावरून वाहतूक सुरू होती. मागच्या आठवड्यात धुव्वाधार पाऊस पडला. दिवसभर मुसळधार पाऊस पडल्याने
गोवरी गावाजवळ असलेल्या नाल्यात वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेला रपटा पावसात वाहून गेला. या अगोदरही नागरिकांनी रस्ता पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून देण्याबाबत आंदोलन केले होते.त्यावेळी सबंधित बांधकाम करणाऱ्या कंपनीने पावसाळ्यापूर्वी गोवरी येथील नाल्यावरील पुलाचे बांधकाम पूर्ण करू असे लेखी आश्वासन दिले होते. परंतु प्रशासनाच्या दिरंगाईमुळे व कंत्राटदाराचे दुर्लक्ष होत असल्यामुळे पूलाचे बांधकाम पूर्णत्वास आलेले नाही .नागरिकांच्या येण्या जाण्यासाठी कुठलाही पर्याय रस्ता तयार करण्यात आलेला नाही. शासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे या भागातील विद्यार्थी व नागरिकांचे प्रचंड बेहाल सुरू आहेत. पुलाचे बांधकाम तात्काळ पूर्ण करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे.

कोट..
भास्कर पाटील जुनघरी, गोवरी.

कंत्राटदाराचे दुर्लक्ष झाल्यामुळे पूलाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे या भागातील विद्यार्थी नागरिकांचे शेतकऱ्यांचे बेहाल आहेत. शेतीचा हंगाम असल्यामुळे शेतकऱ्यांचे काम अडलेली आहेत .त्यांचा नाल्यातून जीवघेणा प्रवास सुरू आहे. काही दुर्घटना झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार कंत्राटदार असतील.

पांडुरंग पाटील पोटे, सरपंच, पोवनी.

हा मार्ग अतिशय वरदडीचा आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी पुलाचे काम पूर्ण करणे गरजेचे होते मात्र प्रशासनाच्या व कंत्राटदाराच्या दुर्लक्षितपणामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावरून शेकडो लोक दररोज येजा करतात. आता मात्र विद्यार्थ्यांचे, रुग्णांचे, शेतकऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे बेहाल सुरू आहेत. पूलाचे काम लवकरात लवकर करण्यात यावे व पर्यायी रस्ता शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात यावा .अन्यथा आंदोलन करण्यात येईल.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page