Saturday, February 24, 2024
Homeचंद्रपूरराजू डोहे याचेवर फौजदारी गुन्हा दाखल करुन प्रतिबंधात्मक कारवाही कराण्यात यावी--माजी आमदार...
spot_img

राजू डोहे याचेवर फौजदारी गुन्हा दाखल करुन प्रतिबंधात्मक कारवाही कराण्यात यावी–माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी दिली तक्रार


बादल बेले ता. प्र. राजुरा : — दिनांक १९ जुलै २०२३ रोजी माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी शिष्टमंडळासह रामपूर ग्रामपंचायतचा समावेश राजुरा नगरपरिषद मध्ये करण्यात यावा यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे मार्गदर्शनात राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांना निवेदन दिले. निवेदन देतानाची ही पोस्ट विविध व्हाट्सअप ग्रुप वर टाकन्यात आली. या पोष्टवर राजुरा येथील राजू डोहे यांनी माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या विरोधात अपमानास्पद व अशोभनीय मेसेज लिहून बदनामी केली. विनाकारण बदनामी करणाऱ्या दुषप्रवृत्त्तीच्या व्यक्तीची चौकशी करून गुन्हा दाखल करुन अटक करण्यात यावी, अशा प्रकारची तक्रार माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी आज (दिनांक २३ जुलै) भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व शेकडो समर्थकांसह राजुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल नागरगोजे यांना दिली. यात डोहे यांनी केलेले आरोप सिध्द करण्याचे आवाहन सुध्दा निमकर यांनी तक्रारीत केले आहे. या तक्रारीची त्वरीत चौकशी करुन कारवाई करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक विशाल नागरगोजे यांनी सांगीतले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सतीश धोटे, अरुण मस्की, मिलिंद देशकर, वाघुजी गेडाम, राधेश्याम अडाणीया, दिलीप वांढरे, महादेव तपासे, सहजाद अली, संजय पावडे, हरिदास झाडे, संदीप गायकवाड, प्रदिप बोबडे, बाळनाथ वडस्कर, रत्नाकर पायपरे, रामदेव गौरकर, भीमराव पाला, प्रकाश फुटाणे, राजकुमार भोगा, प्रदीप पाला, तूलाराम गेडाम, जनार्धन निकोडे, राहुल साळवे, नवनाथ पिंगे, संजय जयपूरकर, सुरेंद्र वेलादे, वंदना गौरकार, संध्या हरिहर, रूपवती जेटमल, मीना वांढरे, राधा तोगर, उषा करमणकर, संतोषी निमकर, कोमल काटम, वंदना पिदुरकर, यांचे सह शेकडो कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते.

कोट : यापूर्वी डोहे यांच्यावर पोलिस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहे. यांनी इतर राजकीय नेत्यांवर बदनामीकारक वॉट्सअप ग्रुपवर पोस्ट केल्या आहे. स्वतःला भाजपा चा नेता समजणाऱ्या या व्यक्तीला पक्षांतर्गत कोणत्या नेत्याचा आधार आहे अशी चर्चा राजुरा शहरात सुरू असून या व्यक्तींवर कठोर कारवाही करण्यासाठी उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page