Sunday, February 25, 2024
Homeगडचिरोली24 जुलैपासून विनाअनुदानित कृती समितीचे आझाद मैदानावर धरणे आंदोलन
spot_img

24 जुलैपासून विनाअनुदानित कृती समितीचे आझाद मैदानावर धरणे आंदोलन

कडोली वार्ताहर :- राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी राज्य कायम अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने दिनांक 24 जुलै 2023 पासून धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे गडचिरोली जिल्हा कायम विना अनुदानित शाळा कृती समितीचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर कवाडकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. मागील वीस ते पंचवीस वर्षापासून नोकरी करत असताना आता कुठे विनाअनुदानित शिक्षकांना अंशतः अनुदानाचा दिलासा मिळाला असला तरी देखील अनुदान देताना शासनाने जाचक अटी व शर्ती लावून लावून अनेक शाळांना अनुदान पासून वंचित केले आहे.तसेच प्रत्येक शिक्षक विना वेतन सेवानिवृत्त झाले आहेत शिवाय शेकडो शिक्षक सेवानिवृत्तीच्या मार्गावर आहेत त्यामुळे शासनाने आता विनाअनुदानित शिक्षकांचा अंत न पाहता मागण्या सर्व मागण्या मान्य कराव्यात यामध्ये प्रामुख्याने सध्या अनुदान घेत असलेल्या अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक 20 टक्के 40% साठ टक्के शाळा वर्ग तुकड्या ना पुढील वाढीव टप्पा याच अधिवेशनामध्ये देण्यात यावा सर्व अंशतः अनुदानित शिक्षकांना सेवा संरक्षण देण्यात यावे शेवटच्या वर्गातील पटसंख्याबाबत ज्याचं गट रद्द करण्यात यावी व इतर मागणी करता हे आंदोलन करण्यात येणार आहे तरी सदर आंदोलनामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील सर्व कायम विनाअनुदानित शिक्षकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान गडचिरोली जिल्हा कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे जिल्हा अध्यक्ष मुरलीधर कवाडकर यांनी यांनी केले आहे.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page