Sunday, February 25, 2024
Homeचंद्रपूरॲड. यादवराव धोटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रा. डॉ. दिनेश दुर्योधन यांचा सत्कार तथा...
spot_img

ॲड. यादवराव धोटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रा. डॉ. दिनेश दुर्योधन यांचा सत्कार तथा ‘आशावलय ‘ वार्षिकांकाचे विमोचन संपन्न.

तालुका प्र. राजुरा:-

ॲड. यादवराव धोटे मेमोरियल सोसायटी राजुरा द्वारा संचालित ,ॲड यादवराव धोटे महाविद्यालय येथे स्व.ॲड यादवराव धोटे यांच्या 20 व्या स्मृतीदिनी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पावन स्मृतीस दोन मिनिटांचे मौन बाळगून आदरांजली वाहिली या दिनाचे औचित्य साधून प्रा. डॉ. दिनेश दिवाकर दुर्योधन यांचा synthesis of D- xylose from rice husk wealth from Waste हा विषय राष्ट्रीय पातळीवर शोधप्रबंध मंजूर झाल्यामुळे महाविद्यालयातर्फे सपत्नीक सत्कार समारंभ पार पडला. तसेच ‘आशावलय’ या वार्षिकांकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे विमोचनाचा कार्यक्रमही घेण्यात आला यावेळी त्यांच्या स्मृतीला उजाळा देतांना वातावरण गहिवरून आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. यादवराव धोटे मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष सुधीर धोटे ,कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माजी आमदार तथा संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. संजय धोटे ,प्रमुख पाहुणे तथा संस्थेचे कोषाध्यक्ष सतीश धोटे, सचिव डॉ. अर्पित धोटे, तसेच वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या मीनाक्षी कालेश्वरवार , कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या वर्षा पोडे, आदर्श शाळेचे चे पर्यवेक्षक बादल बेले, महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रा. मनिषा राखुंडे, भाजपा चे संजय मुसळे, अर्चना दुर्योधन आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्या वर्षा पोडे , संचालन प्रा.आसावरी जिवतोडे तर आभार प्रा. गौरी पायतोड यांनी मानले कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.इर्शाद शेख,संपूर्ण प्राध्यापक वृंद तसेच कर्मचारी वृंदांनी अथक परिश्रम घेतले .कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page