Sunday, February 25, 2024
Homeचामोर्शीविकास कामांसाठी निधी मंजूर करा - आशीष पिपरे
spot_img

विकास कामांसाठी निधी मंजूर करा – आशीष पिपरे


चामोर्शी:-
येथील नगरपंचायत नगरसेवक
व ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री, आशीष पिपरे यांनी गडचिरोली विधानसभा
मतदार संघातील गडचिरोली तालुका ,धानोरा , चामोर्शी तालुक्यातील विविध विकास कामांसाठी भरघोस निधी मंजूर करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र विधीमंडळ पावसाळी अधिवेशन मुंबई येथे प्रारंभ झाला आहे व या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ज्याप्रमाणे चंद्रपूर विधानसभा मतदार संघात विविध विकास कामांकरिता 35 कोटी रुपये मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रमाणे 68 गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे पावसाळी अधिवेशनाच्या पुरवणी विकास कामाच्या यादीत समाविष्ट करण्यात यावे व गडचिरोली विधानसभा मतदार संघातील तीन तालुके लोकसंख्या व क्षेत्रफळच्या दृष्टिकोनातून संपूर्ण जिल्ह्यात खूप मोठे आहे परंतु तालुक्यातील अनेक ठिकाणी रस्ते,नाली,पुलिया, शाळा ,रुग्णालय, यांची अवस्था खूप बिकट आहे सर्वसामान्य गोरगरीब जनता अनेक सोयी सुविधा पासून आजही वंचित आहेत माझ्या नगर पंचायत चामोर्शी क्षेत्रात येथे एखाद्या नागरिकाचा मृत्यू झाल्यास साधा समशान घाट
नाही. मृत्यू उपरांत अंत्यविधी उघडयावर उरकावे लागते ? येथील तिन्ही तालुक्याचा फक्त प्रभाग निहाय विकास नगर परिषद नगर पंचायतचे माध्यमाने मोठया स्तरावर होत आहे परंतु धानोरा, चामोर्शी तालुक्यातील छोट्या खेड्या पाड्यातील विकास 2515 ,3054 , व स्थानिक खासदार ,आमदार निधीच्या व वैशिष्टपूर्ण विकास निधी , ठक्कर बाप्पा इतर आदिवासी विकास विभाग निधीचे भरवश्यावर अवलंबून आहे या भागाचा कायापालट स्थानिक विकास निधीतून व इतर निधीचे माध्यमातून होणे शक्य नाही त्यामूळे ज्याप्रमाणे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी चंद्रपूर विधानसभेच्या विकासासाठी भरघोस निधी मंजूर करण्यात आली त्याच प्रमाणे पावसाळी अधिवेशन जुलै पुरवणी यादीत 68 गडचिरोली विधानसभा सुद्धा समाविष्ट करण्यात यावा व गडचिरोली विधानसभा करिता भरघोस निधी मंजूर करण्याची मागणी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांचे माध्यमातुन राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्हयाचे पालकमंत्री ना, देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री ना, अजितदादा पवार यांना भाजपा ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री नगर पंचायत नगरसेवक आशीष पिपरे यांनी निवेदन व्दारे केले आहे.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page