Sunday, February 25, 2024
Homeगडचिरोलीनिमगावला स्वतंत्र ग्रामपंचायत द्या--ग्रामसभेची मागणी
spot_img

निमगावला स्वतंत्र ग्रामपंचायत द्या–ग्रामसभेची मागणी


धानोरा तालुका प्रतिनिधी:-
धानोरा तालुक्यातील निमनवाडा गट ग्रामपंचायत मध्ये चार गावांचा समावेश आहे.त्याचे विभाजन करून निमगावला स्वतंत्र ग्रामपंचायत उपलब्ध करून देण्याचा ठराव सर्वानुमते जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणावर आयोजित ग्रामसभेत एकमुखाने पारित करण्यात आला.
दिनांक २०/७/२०२३रोज गुरुवारला निमनवाडा येथिल जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणावर मा.देवराव मोंगरकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.
निमनवाडा येथिल गट ग्रामपंचायत मध्ये निमगाव,मासरगाटा,बोरी, निमनवाडा या चार गावांचा समावेश आहे. या चार गावापैकी सर्वात जास्त लोकसंख्या निमगाव येथिल असुन निमगावला
स्वतंत्र ग्रामपंचायत उपलब्ध करून द्या.असा निर्णय ग्राम सभेत एकमुखाने घेण्यात आला. सरपंच छायाताई मडावी व उपसरपंच चेतन सुरपाम,गोपिका ख्रोब्रागडे ग्रा.प.सदस्या , रामटेके बाई इतर प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत दुपारी १.०० वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पटांगणावर आयोजित ग्रामसभेत एकुण १५६ महिला व पुरुष सभासद उपस्थित होते.
या पुर्वी असाच ठराव पारित गावकऱ्यांनी अनेकदा हि मागणी केलि.शासन दरबारी पत्र व्यवहार केला पण शासनाने यावर आजता गायत कोणतेही कार्यवाही केली नाही.ज्या गावची लोकसंख्या ५००च्यावर आहे त्या गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत देन्यिची नियमावलीत आहे.पण याकडे शासनच दुर्लक्ष करीत असेल तर गावाची प्रगती होईल कशी असा प्रश्न गावकरी विचारित आहेत.येथिल बहुसंख्य लोकांना कार्यालयीन कामासाठी वारं वारं निमनवाडा येथे यावे लागते.हे लोकांना परवडणारे नाही. ग्रामसभेचे संचालन मुळे मँडम सचिव यांनी केले.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page