Sunday, February 25, 2024
Homeचामोर्शीरेगडी कन्नमवार जलाशय 'ओव्हरफ्लो '-----------------------------जलाशयाने १०० टक्के पाणी पातळी गाठली
spot_img

रेगडी कन्नमवार जलाशय ‘ओव्हरफ्लो ‘—————————–जलाशयाने १०० टक्के पाणी पातळी गाठलीआता धबधबा पाहण्यासाठी गर्दी
चामोर्शी:- तालुक्यातील कन्नमवार जलाशय १८ जुलै रोजी पाण्याची पूर्ण पातळी गाठत ‘ओव्हरफ्लो ‘ झाल्याने आजच सकाळी ८ वाजताच्या सुमारास जलाशयाच्या सांडव्यावरून ६० से.मी पाणी वाहत असल्याची दिना पाटबंधारे विभागाकडून माहीत मिळाली असून आता हे विंहगमय दृश्य पाण्यासाठी पर्यटकांची मोठी वर्दळ वाढण्याची शक्यता आहे.
कन्नमवार जलाशय हे जिल्ह्यातील एकमेव मोठे जलाशय असून या पाण्याच्या मध्यामातून खरिपात सुमारे अंदाजे १२ हजार हेक्टर शेतजमीनीला सिंचनाची सोय होत असते . कन्नमवार जलाशयाची पाणी पातळी २३०.६३ मीटर असून ६७.५४ द.ल.घ.मी.पाण्याचा साठा केला जातो. १९७३ साली हा जलाशय दिना नदीवर बाधण्यात आले .असून मुख्य कालव्याची एकूण लांबी ५१.३० की.मी असून उपकल्व्याची लांबी १६३.२० की.मी.आहे .
गेल्या चार दिवसापासून पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने १८ जुलै रोजी सकाळी ६.०० वाजता जलाशय १०० टक्के पूर्ण भरला असून आजच सकाळी जलाशय ओव्हरफ्लो झाला असून सांडव्यावरून. ६० से.मी.इतका क्युकेस पाणी ओसंडून वाहत आहे त्यामुळे ओव्हरफ्लो चे दृश्य धबधब्याप्रमणे मनमोहक दिसत असल्याने या परिसरातील पर्यटक व नागरिकानी हे दृश्य पाहण्यासाठी गर्दी वाढणार आहे.
बॉक्स : दमदार पावसाने बळीराजा सुखावला
गेल्या अनेक दिवसांपासून पेरणीची कामे झाल्यावर अपेक्षित पाऊस आला नाही.त्यामुळे बळीराजा चिंतेत सापडला असताना १८ जुलै रोजी दमदार पावसाने हजेरी लावत शेतात पाणी साचलेले दिसून येत असून रोवणीची कामे सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र पीक वाढीसाठी देण्यात येणारी खत मात्रा दिल्या गेली नसल्याने धान परहे लावणी योग्य नसल्याने किमान आठवडाभर आता पावसाने उसंत द्यावी अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहे.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page