Sunday, February 25, 2024
Homeगडचिरोलीएसटी महामंडळच्या भंगार बसने भिवापुर उमरेड मार्गावर प्रवाशाचे केले बेहाल
spot_img

एसटी महामंडळच्या भंगार बसने भिवापुर उमरेड मार्गावर प्रवाशाचे केले बेहाल


दिवाकर भोयर धानोरा ता. प्र.:-
गडचिरोली आगाराची बस क्रमांकMH-40 X 6415 ची बस आज दिनांक 17/7/2023ला गडचिरोली येथुन सकाळी सुटून दुपारी उमरेड भिवापुर मार्गावर बंद पडल्याने या भंगार बसने प्रवाशांना नाहक त्रास सोसावा लागला सोबतच जीव टांगणीला लागला.
गडचिरोली आगाराची गडचिरोली ते नागपूर गाडी भिवापुर ते उमरेड मार्गांवर अचानक बंद पडली.तसेच
या गाडीच्या मागिल टायरचा वरचा पट्टा निघाला आणि त्यानंतर थोड्या दूर गाडी तशीच आणली व त्यानंतर नवेगाव साधू या गावाजवळ गाडी अचानक रेस झाल्याने प्रवासी घाबरून गेले स्वताच्या जीव मुठीत घेऊन पटापट प्रवाशी गाडीमधून उतरलेत. गाडी आपोआप रेस झाल्याने पाच मिनिटापर्यंत रेस होतो ती. त्यामुळे प्रवाशात भिंती निर्माण झाली. त्यानंतरही दहा मिनिटं अशीच जर रेस होत राहिली असती तर इंजन फुटलं असतं असं ड्रायव्हरने सांगितलं. म्हणजेच गडचिरोली आगाराच्या गाड्या ज्या आहेत त्या पूर्णपणे भंगार अवस्थेत आहे. हीच गाडी सकाळी गडचिरोली वरून 8.00 वाजता सुटणार होती परंतु ती 9.00वाजता सुटली याचे कारण चौकशी कक्षात विचारलं असता त्यांनी सांगितले गाडी दुरुस्त करत आहे. गाडी दुरुस्त झाल्यावर ती सोडण्यात येईल. त्यानुसार गाडी आगारातून सोडल्या नंतर गडचिरोली वरून निघाली आणि उमरेड जवळ येऊन ति भंगार गाडी बंद पडली .अशा अवस्थेत गडचिरोली आगार प्रवाशांच्या जीवाशी खेळ खेळत आहे.अशा पद्धतीने एसटी महामंडळ प्रवाशांच्या सोयीसाठी आहे कि प्रवाशांच्या प्रवासात विघ्ने निर्माण करणारी असल्याचे दिसून येते.यामुळे प्रवाशांना विविध समस्या चार सामना करावा लागला.अशा भंगार बसेसचा प्रवाशांच्या होनारा त्रास थांबविण्यासाठी आगार प्रमुखांनी याकडे जातिने लक्ष देण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

महामंडळ च्या भंगार बसने प्रवास करुन स्वताच्या जिव धोक्यात टाकत असल्याचा अनुभव आल्याची आपबिती प्रतिक्रिया बस प्रवासी भविकदास करमरकर यांनी दिली

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page