Sunday, February 25, 2024
Homeचंद्रपूरश्री गुरुदेव सेवा मंडळाने केला श्रद्धा हिवरेचा सत्कार
spot_img

श्री गुरुदेव सेवा मंडळाने केला श्रद्धा हिवरेचा सत्कार

तालुका प्रतिनिधी राजुरा:- रामपूर येथील सौ.सरोजताई व विठ्ठलराव हिवरे यांची सुकन्या कु.श्रद्धा विठ्ठल हिवरे हिने बॅचलर आफ फॅशन डिझाईनींग मध्ये गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथून प्रथम मेरिट प्राप्त कले, त्यामुळे गोंडवाना विद्यापीठात झालेल्या दहावा दिक्षांत समारोहात विशेष अतिथी ‌भारताच्या राष्ट्रपती महामहिम मा. दौपदी मुर्मु यांचे उपस्थितीत मान्यवरांचे हस्ते कु.श्रदृधा हिवरे ला सन्मानित करण्यात आले.
कु.श्रद्धा चे कुटुंबीय श्री गुरुदेव सेवा मंडळाशी जुळलेलै आहे त्यामुळे श्री गुरुदेव सेवा मंडळ राजुरा तालुका व रामपूर शाखेच्या संयुक्त विद्यमाने ॲड.राजेंद्र जेनेकर केंद्रिय सदस्य प्रचार विभाग गुरुकुंज आश्रम यांचे हस्ते कु.श्रद्धा चा शाल,ग्रामगीता व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी अनिलजी चौधरी,प्रकाश उरकुंडे,बाळा गोहोकर,ॲड.सारीका जेनेकर,गजानन बोढे,नामदेव पेचे,शैलेश कावळे,देविदास वांढरे,दुबे गुरुजी, संगिता पिंपळकर,उत्तम अवघडे,चाफले,राजेंद्र मालेकर,निखिल गिरी,सौ.अरुणा चौधरी,सौ.प्रतिभा बोढे,सौ.सुवर्णा कावळे,सौ.अश्विनी वांढरे आदींची उपस्थिती होती,सर्वांनी श्रद्धाचे कौतुक व अभिनंदन केले त्याबद्दल कु.श्रद्धा ने आभार व्यक्त केले. विशेष म्हणजे विठ्ठल हिवरे यांचे वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन निमित्ताने सामुदायिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी श्री.प्रकाश उरकुंडे सचिव यांनी मार्गदर्शन केले.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page