Saturday, February 24, 2024
Homeचंद्रपूरअखेर कोलगाव वासियांना मिळाले पिण्याचे शुद्ध पाणी.
spot_img

अखेर कोलगाव वासियांना मिळाले पिण्याचे शुद्ध पाणी.

  • सभापती सुनील उरकुडे यांनी दिलेला शब्द केला पूर्ण.

तालुका प्रतिनिधी राजुरा:- तालुक्यातील वर्धा नदीच्या तिरावर वसलेले कोलगाव हे पूर प्रभावित गाव आहे मागल्या वर्षी तब्ब्ल सतरा दिवस कोलगाव ला पुराणे वेढलेले होते त्या परिस्थितीची पाहणी करणे व पूरपुढीतांना धान्य वाटप करण्याच्या अनुषंगाने जी प चंद्रपूर चे माजी सभापती सुनील उरकुडे गावात गेले असता त्या गावातील पूर परिस्थिती मूळ पूर ओसरून गेल्यानंतर ही पाण्याचे स्रोत प्रभावीत् असतात आणी तसे दूषित पाणी पिल्याने नागरिकांना साथीच्या रोगांना समोरे जावं लागतात त्या करिता जल शुद्धीकरण यंत्र बसवून देण्याची मागणी सरपंच सौ अनिता पिंपळकर,माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच पुरुषोत्तम लांडे तथा समस्त ग्रामवासियांनी केली त्यावेळी माझा कार्यकाळ संपुष्टात आला असला तरी कोलगाव च्या या रास्त मागणीला मान देत पुढील पावसाळ्या आधी आर ओ बसावून देण्याचा शब्द सभापती सुनील उरकुडे यांनी दिला होता.
दिलेला शब्द पूर्ण करत कोलगाव येथे जिल्हा निधी अंतर्गत आर.ओ. चे काम मंजूर करून दि.15/7/2023 ला काम पूर्ण होऊन आर.ओ. चे शुभारंभ माजी सभापती सुनील उरकुडे यांच्या हस्ते पार पडले.
सदर प्रसंगी भाजपा जिल्हा सचिव मधुकर नरड,जिल्हा उपाध्यक्ष भाजयुमो सचिन डोहे, सरपंच सौ अनिता सुधाकर पिंपळकर (सरपंच), पुरुषोत्तम लांडे माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच,भाजप कार्यकर्ते दीपक झाडे, राहुल सूर्यवंशी जिल्हा युवा नेते अक्षय निब्रड ग्रा,प,सदस्य, पुष्पा झुंगरे सदस्य ममता पोतराजे सदस्या, शंकर पासपुते सदस्य,मारोती भोंगळे, विनोद पोतराजे, रमेश उरकुडे, चंदू दिवसे, राजू पिंपळकर, जगदीश लांडे, प्रशांत मोरे, अजय पिंपळकर, रवींद्र झुंगरे समस्त ग्रामवासी उपस्थित होते व सर्वांनी सुनील उरकुडे यांचे आभार मानले व भविष्यात गावाच्या समस्यांसाठी असच सहकार्य करत राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page