Friday, February 23, 2024
HomeUncategorizedपी एस आय म्हणून निवड झालेल्या भूषण कारडेचा सत्कार-------------------------पोलिस स्टेशनचा उपक्रम
spot_img

पी एस आय म्हणून निवड झालेल्या भूषण कारडेचा सत्कार————————-पोलिस स्टेशनचा उपक्रम


चामोर्शी :- नुकत्याच झालेल्या पीएसआय परीक्षेत चामोर्शी तालुक्यातील आमगाव महाल येथील भूषण विलास कारडे यांचा चामोर्शी पोलिस स्टेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला .
याप्रसंगी पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील, पोलिस उपनिरीक्षक सुधीर साठे, उपनिरीक्षक तुषार पाटील, राकेश टेकाम , पत्रकार समितीचे उपाध्यक्ष बबन वडेट्टीवार, सचिव कालिदास बनसोड, सहसचिव चंद्रकांत कुनघाडकर , कोषाध्यक्ष अयाज शेख, सदस्य गजानन बारसागडे, अमित साखरे, सत्कारमूर्ती भूषण कारडे , भूषणचे आजोबा एकनाथ बुरांडे , पो. पा . श्रीरंग म्हशाखेत्री, वैशाली जराते आदी उपस्थित होते .
याप्रसंगी पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील म्हणाले की, ग्रामीण भागातील व सामान्य परिवारासाठी ही एक अभिमानाची व गर्वाची बाब असून यापुढेही उच्च पदावर आरूढ होण्यासाठी शुभेच्छा दिल्या .
व पत्रकार समितीकडून गजानन बारासागडे यांनी जिद्दीने झटणाऱ्या व अभ्यासू वृत्ती जोपासणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांचा हा विजय आहे असे गौरोद्गार काढले .
यावेळी पीएसआय पदावर निवड झालेल्या भूषण कारडे यांचा पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील व पत्रकार समिती पदाधिकारी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या .
सत्काराला उत्तर देताना भूषण कारडे यांनी ‘ स्वतःची जिद्द व परिस्थितीची , आई – वडीलांची जाणीव मनात ठेवून केलेल्या परिश्रमाचे हे फळ असल्याचे म्हटले ‘ .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार पाटील तर आभार अयाज शेख यांनी मानले .

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page